👉सायबर विश्वात कायद्याचे भान बाळगणे आवश्यक….. ( भाग १ )

👉सायबर विश्वात कायद्याचे भान बाळगणे आवश्यक….. ( भाग १ )

126
0
SHARE
IHROlogo-GenXSentinel
IHROlogo-GenXSentinel

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन,भारत

👉सायबर विश्वात कायद्याचे भान बाळगणे आवश्यक….. ( भाग १ )

मोबाईल, संगणक, फेसबुक,व्हॉटस्अॅप, ट्विटर, आदी तंत्रज्ञान समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. मात्र ही साधने वापरताना नकळत, तर कधी जाणुनबुजून आपल्या हातून एखादी बेकायदा कृती घडते.ती कृती कायद्याचे उल्लंघन करणारी असते. म्हणजे सायबर गुन्हा आपण केलेला असतो, पोलिस जेव्हा आपल्या दारात उभे राहतात. तेव्हा आपल्याला आपण सायबर गुन्हा केल्याचे कळते. त्यामुळे सायबर विश्वात वावरताना कोणती काळजी घ्यावी याबाबत पोलिस ….
🖥 ” सायबर लॉ” म्हणजे काय ?
संगणक, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरताना नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. या आव्हानांचा विचार करुन सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, संगणक, इंटरनेट या विषयी कायदे केलेले आहेत. त्यांना ” सायबर लॉ ” म्हणतात.

🔗⛓💰💶💸
सायबर गुन्हा म्हणजे काय ?
…… माहिती तंत्रज्ञानातील कोणत्याही साधनांचा बेकायदा उपयोग म्हणजे सायबर गुन्हा होय.समाजामध्ये सतत असे गुन्हे घडत असतात. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये पैसा, फसवणूक ही मुख्य कारणे आहेत . माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ४३, ४३ (अ ), ते ४३ (ज ) , कलम ६५, ६६, ६६ ( अ ) ते ६६ ( क ) , ६७, ६७ ( क ) मध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे,

सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार तज्ञ असल्याने आपला पासवर्ड सतत बदलत राहणे आवश्यक असते.

LEAVE A REPLY