SHARE
Iliyana-GenXentinel
Iliyana-GenXentinel

मुंबई – इलियाना डी क्रूझ ही अभिनेत्री आपल्या परदेशी बॉयफ्रेण्ड अँड्र्यू नीबोनसोबत विवाहबद्ध झाल्याचं म्हटलं जात आहे.इलियाना डी क्रूझच्या एका इन्स्टाग्राम फोटोच्या कॅप्शनवरुन तिने लग्न केल्याचा अंदाज लावला जात आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ह्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने बॉयफ्रेण्डचा उल्लेख ‘हबी’ अर्थात नवरा असा केल्याने तिने लग्न केल्याची चर्चा आहे.

ख्रिसमसला इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हबी’ असा उल्लेख केला होता. “माझ्यासाठी ख्रिसमसचा काळ हा वर्षातील सर्वात आवडता काळ असतो. हॅप्पी हॉलिडेज, फोटो बाय हबी,” असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.

LEAVE A REPLY