SHARE
नागपूर :-  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार येत्या १ जुलै पासून वस्तू आणि सेवा करांवर जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाईल ,मोबाईल एक्सेसिरीझ ,चपला अशा इतर वस्तूंवर ऑनलाईन सेल ऑफर्सचा वर्षाव सुरु झालेला आहे. त्यामुळे ऑनलाईन वेबसाईटवर खरेदींवर सूट दिली जात आहे.
         दुकानदार शिल्लक असलेल्या मालावर कमी नफा मिळवत आहे. जीएसटी १ जुलै पासून सुरु झाल्यास कराच्या दरात  वाढ होईल. शिवाय जीएसटी लागू झाल्यावर दुकानात अधिक शिल्लक असलेल्या मालाचा हिशोब कागदपत्राने करावं लागणार आहे.
 या व्यवहारात आणखी गुंतागुंत होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टाळण्यासाठी दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर स्टॉक क्लिअरिंग सेल सुरु झाला आहे. दुकानांमध्ये स्टॉक क्लिअरिंगमध्ये एअर कंडिशनरवर १० ते ४० टक्के सूट दिली जात असून तयार कपड्यांवर ५० टक्क्यांची सूट दिली जात आहे. या आठवड्यात ऑनलाईन मार्केटिंग ने पेटीएम मॉल मध्ये ३ दिवसाचा  प्री- जीएसटी सेल सुरु केला आहे.
 हा सेल १३ ते १५ जून पर्यंत सुरु होता त्यात रिटेलर्स  ग्राहकांसाठी ५०० ब्रॅण्ड ठेवल्या होत्या. इलेकट्रोनिक वस्तू आणि तयार कपड्यांसह दुचाकी गाड्यांच्या किमतीवरही मोठी सवलत दिली जात आहे. बजाज ऑटोने दुचाकीच्या खरेदीवर साडेचार हजार रुपयाची सूट देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रि-जीएसटी सेलमध्ये टीव्ही, ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू आणि लॅपटॉप, डीएसएलआर कॅमेरा यांच्या खरेदींवर २० हजार रुपयापर्यंत  कॅशबॅक मिळणार आहे. ब्लूटूथ स्पीकर, चपला आणि दागिन्यांवर ४० टक्के सवलत आणि २५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे शिल्लक मालाची झटपट विक्री व्हावी यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरु आहे. याचा थेट परिणाम वाहन उद्योगावर होत असल्यामुळे कर कंपन्यांनी ग्राहकांवर सवलतीचा पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे. सवलतींची किमान रक्कम ३० हजार रुपये, तर कमाल रक्कम २. लाख रुपये आहे.

       मारुती सुझुकी, हुंदाई, होंडा, निसान, महिंद्रा अँड महिंद्रा व फोर्ड इंडिया या सर्व कंपन्या चालू महिन्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन आल्या आहेत. या कंपन्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वी सवलती देऊ केल्यामुळे सर्व योजना जून महिन्यासाठीच घोषित केल्या आहेत.
      देशातील सर्वात मोठी कर उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने २५ हजार ते ३५ हजार रुपये सवलत देऊ केली आहे. यातील सर्वाधिक सवलत हॅचबॅक प्रकारातील अल्टो कारवर मिळत आहे. महिंद्रा अँड महिंद्राने स्कॉर्पिओ कारवर २७ हजार रुपये सवलत तर एक्सयूव्ही-५०० वर ९० हजार रुपये सवलत दिली आहे. हुंदाई मोटार इंडियाने एलिट आय २० कार्व्हर २५ हजार रुपये व नव्या एक्सेंटवर २. ५ लाख रुपये सवलत दिली आहे. शिवाय कंपनीने ईऑन वर ४५ हजार रुपये, ग्रँड आय १० वर ७३ हजार रुपये तसेच सेडान प्रकारातील वेर्ना  कारवर ९० हजार रुपये सूट दिली आहे.
होंडा कार्स इंडिया ने ब्रायो कार्व्हर १४ हजार ५००, सेडान अमेझव्र्ह ५० हजार रुपये, हॅचबॅक जॅझ वर १७ हजार रुपये आणि बी-आर व्ही कार्व्हर ६० हजार रुपये कमी केले आहेत.
        यासंदभात होंडा कार्स इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले कि “१० जून ते ३० जून या काळासाठी या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहक जीएसटीपूर्वीच्या किमतींवर कर खरेदी करतील. जीएसटी लागू झाल्यावर कारच्या एक्स-शो रुम किमतीत पडणारा फरक संबंधित वितरक ग्राहकाला देईल. फोर्ड इंडियानेही या कार किंमतयुद्धात उडी घेतली आहे.
           कंपनीने इकोस्पोर्ट वर २० हजार ते ३० हजार रुपये सवलत दिली आहे. फिगो व अॅस्पायर या कारवर १० हजार ते २५ हजार रुपये सूट देऊ केली आहे. निस्सान कंपनीने मायक्रा कारवर २५ हजार व टेरानो कारवर ८० हजार रुपये सूट दिली आहे.

जीएसटी परिणाम पुढीलप्रमाणे

– जीएसटी अंतर्गत सर्वच प्रवासी कार वर २८ टक्के कर लागणार आहे. याशिवाय एक ते १५ टक्के उपकरही त्यावर लागू होणार आहे.

– १२०० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असलेल्या छोट्या पेट्रोल कारवर एक टक्का उपकर लागणार आहे.

– १५०० सीसीपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन असलेल्या छोट्या डिझेल कार वर तीन टक्के उपकर लागू होणार आहे.

– १५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या मोठ्या कारवर तसेच १५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या व चार मीटरपेक्षा अधिक लांबी असलेल्या गाड्यांवर १५ टक्के उपकर लागू होणार आहे.
आलिशान गाड्यांची निर्मिती करणाऱ्या ऑडी कंपनीने गाड्यांच्या किंमती १० लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. बीएमडब्ल्यूनेही एक्स शोरूम किंमतीवर १२ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे. मर्सिडिझ बेंझने भारतात तयार होणाऱ्या कारवर सात लाख रुपयांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरवर १०.९ लाख रुपांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

अशा आहेत सवलती
कंपनी सवलत (रुपये)
मारुती सुझुकी २५,००० ते ३५,०००
महिंद्र अँड महिंद्र २७,००० ते ९०,०००
ह्युंदाई मोटर इंडिया २५,००० ते २.५ लाख
होंडा कार्स इंडिया १४,००० ते ६०,०००
फोर्ड इंडिया ३०,०००
निस्सान २५,००० ते ८०,०००
ऑडी १० लाख
जग्वार लँड रोव्हर १०.९ लाख

LEAVE A REPLY