SHARE
केसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी-GenXSentinel
केसरीच्या सेटवर अक्षय कुमार जखमी-GenXSentinel

वाई

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. या अपघातानंतर अक्षयला डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी अक्षयला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला होता मात्र अक्षयने त्यासाठी नकार देत कामाला प्राधान्य दिले आहे.

केसरी या चित्रपटाचे शूटींग सध्या साताऱ्यातील वाई येथे सुरू आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्ससाठी एक स्टंट करत असताना अक्षय कुमार जोरात जमिनीवर आदळला. त्यामुळे त्याच्या छातीला व बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर सेटवरील डॉक्टरांनी अक्षयला आराम करण्याचा सल्ला दिला. दिग्दर्शकांने अक्षयला मुंबईला जाण्यास सांगितले. त्यासाछी अक्षयचे हेलिकॉप्टर देखील तयार ठेवण्यात आले होते. मात्र अक्षयने मुंबईला न जाता वाईतच राहून आराम करायचा निर्णय घेतला. जेणेकरून बरं वाटताच तो लगेच शूटींगसाठी परतू शकेल.

१८९७मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर अक्षयचा आगामी केसरी हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अक्षय हवालदार इश्वर सिंग यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय सोबत परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY