SHARE
link PAN to Adhar
link PAN to Adhar

नवी दिल्ली : जर तुम्ही पॅन कार्ड अजून नसेल बनवलं तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पॅनकार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. शिवाय पॅनकार्डला आधार कार्ड नंबरशी जोडणं ही अनिवार्य झालं आहे.

जीएसटीमुळे वाढलेल्या तीन टक्के अधिकच्या कराचा बोजा हा ग्राहकांवर येणार आहे. पोस्टपेडचं मोबाईल बिल शंभर रुपये असेल तर ते आता ११८ रुपये येईल. प्रिपेडच्या बाबतीत मात्र कंपन्या कोणती भूमिका घेतात याकडे मात्र लक्ष लागलं आहे.

सरकारने पॅनकार्डसाठी आधार नंबर किंवा त्याचा अर्ज क्रमांक देणं अनिवार्य केलं आहे. याबाबत सरकारने नवे आयकर नियम जाहीर केले आहे. आयकर विभागाने पॅननंबर आधार नंबरशी जोडण्यासाठी ई-फायलिंग वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर आणि आधार नंबर लिंकिग करणं सोपं होऊन जाईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आधार आणि पॅन नंबर लिंक करु शकता.

लिंक – https://incometaxindiaefiling.gov.in

LEAVE A REPLY