SHARE

कॉलिंग, एसएमएस, इंटरनेटच्या आकर्षक ऑफर्ससह भारतीय दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्यारिलायन्स जिओने इतर स्पर्धक कंपन्यांना आणखी एक मोठा धक्का देण्याचं ठरवलं आहे. लवकरच रिलायन्स जिओ ५००रुपयांचा फिचर  फोन ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. फोटोंवर क्लिक करा आणि पाहा काय आहेत या एवढ्या स्वस्त फोनचीवैशिष्ट्येह्या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 4G VoLTE नेटवर्क.                                         2G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना एवढ्यास्वस्त दरात 4G नेटवर्क फोनची सुविधा देत रिलायन्स ग्राहकांना आकर्षित करू पाहत आहे. 4G VoLTE नेटवर्कचालविणारी रिलायन्स जिओ ही सध्या देशातील एकमेव कंपनी आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांच्याVoLTE नेटवर्कसाठीच्या चाचण्या अद्याप सुरू असून व्यावसायिकरित्या त्यांचे लॉंचिंग व्हायचे आहे.

एका अहवालानुसार, हा फोन शांघाय स्थित स्प्रेडट्रम कम्युनिकेशन्स प्रोसेसवर चालणारा असेल. मीडियाटेक आणि क्वॉलकॉमसारख्या मोबाइल चिप उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करत आपल्या बेसबँड चिप श्रेणीत रिलायन्स जिओने वाढ केली आहे.कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीसोबतच्यादोन वर्षांच्या भागीदारीसह आपल्या LYFफ्लेम ५ स्मार्टफोनला बळकटी दिली आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या २१ जुलै रोजी होणाऱ्या वार्षित सभेत रिलायन्स जिओ आपल्या ५०० रुपयांच्या 4G volte फोनचीघोषणा करण्याची शक्यता आहे. एचएसबीसीच्या मते, जर रिलायन्स जिओ ५०० रुपयात ग्राहकांना हा फोन देणार असेल तरकंपनी प्रत्येक हँडसेटवर जास्तीत जास्त ६५० ते ९७५ रुपयांची सबसिडी देणार आहे. यापूर्वी या फोनची किंमत १००० रुपयेअसू शकते, अशीही चर्चा होती. जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला हा फोनच्या शिपमेंट प्रक्रियेला सुरुवात होईलआणि १५ ऑगस्टपर्यंत हा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.

आपल्या ‘धन धना धन’ ऑफर व्यतिरिक्त रिलायन्स जिओ दरमहा १५० रुपयांचे प्लानही घेऊन येणार आहे. कंपनीने आताकमीत कमी ८० ते ९० रुपयांच्या नव्या टारिफ प्लानची योजना सुरू करण्याचा मानसही व्यक्त केला आहे. कंपनीने ‘धन धनाधन’ योजनेअंतर्गत जिओ फ्री व्हॉइस कॉल्स, अनलिमिटेड एसएमएस, जिओ अॅप्सची सुविधा तसंच रु. ३०९ किंवा रु. ५०९ एकदाच भरून दररोज अनुक्रमे १ किंवा २ जीबी डाटाइत्यादी सुविधा नव्या ग्राहकांना रु. ९९ च्या शु्ल्कासह दिल्या होत्या. एप्रिल २०१७पर्यंत जिओची ग्राहकसंख्या ११२.५५ दशलक्षच्या घरात पोहोचली होती. आता जिओच्या ५०० रुपयांच्या फिचर फोनमुळे तीअधिकच वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY