SHARE
गंगेच्या स्वच्छतेवर ३८०० कोटी खर्चूनही 'गंगा' अजूनही मैलीच -GenXSentinel
गंगेच्या स्वच्छतेवर ३८०० कोटी खर्चूनही 'गंगा' अजूनही मैलीच -GenXSentinel

नवी दिल्ली – एक वर्षापेक्षाही कमी कालावधी मोदी सरकारचे पाच वर्ष पूर्ण होण्यास उरलेला असून जनतेने नवा बदल होण्याच्या आशेने मोदींना पंतप्रधान बनवले. मोदींनी निवडणूकीपूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी गंगेची स्वच्छता करण्याचे एक होते. पण खरे पाहिल्यास गंगा स्वच्छतेसाठी खर्च झालेला केवळ निधीच मोठा दिसतो आणि त्यासाठी काही मंत्री बदलले गेले एवढेच दिसते.

सुरूवातीला गंगा स्वच्छता अभियानाचे मंत्रीपद उमा भारतींना दिले होते. पण त्यांचे कार्य समाधानकारक नसल्याने केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री नितिन गडकरींना त्यांच्याजागी हे पद देण्यात आले. एक आरटीआय गंगा स्वच्छता अभियानाबद्दल दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले असून ३८०० कोटी रुपये गंगा स्वच्छते दरम्यान खर्च झाल्याचे समजते. गंगा स्वच्छतेचे काम एवढे पैशे खर्च झाल्यानंतरही दिसत नाही.

नितिन गडकरींचे गंगा स्वच्छतासंबंधात फक्त काही ट्विटच शिल्लक राहिलेले आहेत. त्यांनी त्यामध्ये म्हटले होते, की भारताचा पहिला पीपीपी मॉडल आधारित हायब्रिड एन्यूटी प्रोजेक्ट गंगा साफ करण्यासाठी वाराणसीत स्थापन करणार आहोत. ३०० एमएलडी सांडपाणी वाराणसीत तयार होते. गंगेत या सांडपाण्याला जाण्यास रोखण्यापासून १०२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी सध्या कार्यरत आहेत. २०२० पर्यंत ८० टक्के गंगा स्वच्छ करण्याचा संकल्प मोदी सरकारने केला होता. पण मागच्या चार वर्षात गंगेची स्वच्छता किती प्रमाणात झाली याचे काहीही रेकॉर्ड नाहीत.

LEAVE A REPLY